Maharashtra Grampanchayat Election 2021 | ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंच सोडत जाहीर होणार
राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. मात्र या संदर्भात एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार आहे. ज्या आठ जिल्ह्यात निवडणुकीआधीच सरपंचपदाचं आरक्षण जाहीर झालेलं होतं, तेही या नव्या निर्णयामुळे रद्द झालं आहे. ग्रामविकास विभागाने आरक्षण सोडतीचा निर्णय घेतल्यानंतर संबंधित जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आदेश काढून जुनं आरक्षण रद्द केलं आहे. खऱ्या आरक्षित माणसाला न्याय मिळण्यासाठी, घोडेबाजार थांबण्यासाठी, प्रामाणिक माणसांना न्याय मिळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.
याआधी ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाची सोडत जाहीर होत होती. आठ जिल्ह्यांमध्ये तशी सोडत जाहीर देखील झाली होती. मात्र सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार आणि खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळं 14 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जानेवारीमध्ये काढण्यात येणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.
![Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची गरज संपली- विजय वडेट्टीवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/20/8f614ca5c22638f3a5c2c6d7adff844917373740009381000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/20/ae53d597338c23f33bdc7162719b4f0217373732764411000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/20/7a8e2f549f4fb03b445a04df730fa60f17373722247551000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/20/05a82b4507260ca50e9b24208eed296717373698298411000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/20/13f5a8c378106dd3c779e774b661ced417373683898901000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)