एक्स्प्लोर
Doctors On Strike: डॉक्टरांच्या विविध संघटनांचं आज काम बंद आंदोलन
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर (Phaltan Doctor Suicide Case) संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासावर आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर आवाज उठवत, IMA आणि MARD सारख्या प्रमुख संघटनांनी राज्यव्यापी 'काम बंद' आंदोलनाची (Doctors' Strike) हाक दिली आहे. 'महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं होत नसल्याचा आरोप डॉक्टरांच्या संघटनांनी केला आहे.' या आंदोलनामुळे राज्यभरातील रुग्णालयांमधील ओपीडी सेवा ठप्प झाली आहे, मात्र आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, याच प्रकरणात नाव आल्याने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांनी आज फलटण येथे एका सभेद्वारे होत असलेल्या आरोपांवर उत्तर देणार असल्याचे जाहीर केले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















