(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Cabinet Decision : शेतकरी, वीज ग्राहक आणि पोलीस, राज्य सरकारचे तीन मोठे निर्णय ABP Majha
राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारनं काल महत्त्वपूर्ण निर्णय घेत शेतकरी, वीज ग्राहक आणि पोलिसांना दिलासा दिला. शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय सरकारनं घेतला. या योजनेचा लाभ 2019 मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनाही घेता येणार आहे. याशिवाय अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांना वीज दरात सवलत देण्याचा निर्णयही कायम ठेवण्यात आलाय. राज्यातील वीज वितरण प्रणाली मजबूत करण्यासाठी आता प्रिपेड स्मार्ट मिटर बसवण्यात येणार आहेत. याशिवाय पोलिसांच्या घरांसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचा निर्णयही काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय. त्यातून पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.