एक्स्प्लोर
Maharashtra Assembly brawl | विधानभवनातील राडा, राष्ट्रपती राजवटीची मागणी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप!
महाराष्ट्राच्या विधानभवनात झालेल्या हाणामारीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. विधानभवनात गुंडगिरी पोहोचल्याची टीका विरोधकांनी केली आहे. या राड्यानंतर विधानसभा अध्यक्ष कारवाईबाबत माहिती देणार आहेत. एका कार्यकर्त्याला अटक झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह मध्यरात्री विधानभवनाच्या गेटवर आंदोलन झाले. या हाणामारीप्रकरणी दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना थोड्याच वेळात किल्ला कोर्टात हजर केले जाईल. गोपीचंद पडळकर यांनी 'सहकार्याची चूक झाली, कारवाई व्हावी' अशी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांनी 'भविष्यात विधानभवनामध्ये आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही' अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. खासदार संजय राऊत यांनी विधानभवनात 'गँगवार' झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची गरज असल्याचे म्हटले. भास्कर जाधव यांनी हातवाऱ्यांच्या मुद्द्यावर दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली, जी विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारली. हाणामारीनंतर अभ्यागत यलो पासधारकांना विधानभवनात प्रवेश बंद करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी मीरा भाईंदरमध्ये सभा घेणार आहेत, तर मराठा समाजाकडून आज अक्कलकोट बंद पुकारण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा निषेध म्हणून हा भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. बारामतीत बँक ऑफ बडोदाचे शाखा व्यवस्थापक शिवशंकर मित्रा यांनी बँकेतच आत्महत्या केली. सुसाइड नोटमध्ये बँकेच्या दबावामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे.
महाराष्ट्र
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर






















