(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Loksabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज कुणी कुणी केले दाखल ?
Loksabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज कुणी कुणी केले दाखल ? लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचा अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस होता. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे. या पाच लोकसभा मतदारसंघांसाठी आज अर्ज दाखल झाले. नागपुरात गडकरींनी आज अर्ज दाखल केला. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी काल उमेदवारी दाखल केलीय. तर चंद्रपुरात काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांनी आज अर्ज दाखल केला. त्यांची लढत सुधीर मुनगंटीवार यांच्याशी होणार आहे. मुनगंटीवारांनी काल अर्ज दाखल केलाय. भंडारा गोंदिय़ात भाजपकडून सुनील मेंंढे यांनी तर काँग्रेसकडून प्रशांत पडोळेंनी अर्ज दाखल केले. भंडारा गोंदिय़ातच वंचितचे संजय केवटही रिंगणात आहेत. गडचिरोलीतून वंचितचे राजेश बेले यांनी आज अर्ज दाखल केला तर काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांनीही आज अर्ज दाखल केलाय. भाजपच्या अशोक नेतेंनी कालच उमेदवारी दाखल केलीय. तर रामटेकमध्ये शिवसेना उमेदवार राजू पारवे यांनीही आज अर्ज दाखल केला.