Lal Krishna Advani Bharat ratna Award : थोडा उशीर पण निवड योग्य, अडवाणींचे पवारांकडून अभिनंदन
Lal Krishna Advani Bharat ratna Award : थोडा उशीर पण निवड योग्य, अडवाणींचे पवारांकडून अभिनंदन
मुंबई: भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना (Lal Krishna Adwani) देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर देशभरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) देखील अभिनंदन केले आहे. भारतरत्न जाहीर झालेली दोन्ही नावं अतिशय योग्य असून थोडा उशीर झाला पण योग्य निवड आहे, असे म्हणत शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला (भाजप) टोमणा मारला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे.
शरद पवार म्हणाले, भारतरत्न जाहीर झालेली कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण आडवाणी दोन्ही नावं अतिशय योग्य आहेत. अडवाणी देशाच्या संसदेत अनेक वर्ष होते. भाजपचे नेते, संसदेचे सदस्य, मंत्री म्हणून आदर्श काम करत आहेत. थोडा उशीर झाला पण योग्य निवड आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्णी अडवाणी संसदेत अनेक वर्षे होते. त्यांचा पराभव कधी झाला नाही, रथयात्रा काढली तेव्हा एकदा मतभेद झाले.थोडा उशीर झाला पण योग्य निवड आहे. त्यांना सन्मान मिळाला आहे,आता समाधान व्यक्त करतो. त्यांच्या पक्षात काय घडलं याच्या खोलात जात नाही.