KOO Daily Question: लतादीदींच्या अंत्यसंस्कारावेळी केलेल्या कृतीवरुन शाहरुखला ट्रोल करणं योग्य?
एबीपी माझाच्या कू अॅप हॅण्डलवर आम्ही रोज एक मुद्दा मांडतो. त्यातली एक कमेंट स्पेशल रिपोर्टमध्येही दाखवतो... आमचा आजचा मुद्दा होता...लतादीदींच्या अंत्यसंस्कारावेळी केलेल्या कृतीवरुन शाहरुखला ट्रोल करणं योग्य? तर यावर सिद्राम राऊत यांनी आपलं मत नोंदवलंय, ते म्हणतात...शाहरुख खानचा दुवा मागतानाचा फोटो व्हायरल करायचा मग त्यानं फुंकर घातलेली असताना त्याऐवजी थुंकलं म्हणून ती पोस्ट व्हायरल करायची आणि विविधतेने नटलेल्या भारताला बदनाम करण्याचं काम हे ट्रोलर करतायत. हे चुकीचं आहे. तर ही झाली आजची कमेंट. एबीपी माझाच्या कू अॅप हॅण्डलवर उद्या आम्ही नवीन मुद्दा घेऊन येऊ. त्यावर तुम्ही आवर्जून तुमचं मत नोंदवा.





















