Kasba Bypolls Election : कसबा मतदारसंघात दुहेरी लढत, हेमंत रासने - रविंद्र धंगेकर आमने -सामने
पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे... कसबा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय... तर राष्ट्रवादीचे नाना काटेदेखील मतदानासाठी दाखल झाले आहेत... या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि मविआची प्रतिष्ठा पणाला लागली आहे... आज उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार असून मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे... कसबा पेठ मतदारसंघात दुहेरी लढत होत आहे. इथं भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होत आहे... तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होत आहे... दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतात निवडणूक लढवत आहेत... याशिवाय महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत.