एक्स्प्लोर
Devendra Fadanvis : मराठीचा झेंडा आणि वादाचा अजेंडा; विरोध करणाऱ्यांना फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
दिल्लीतील Jawaharlal Nehru University (JNU) मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी अध्ययन केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत झाले. या सोहळ्यादरम्यान Student Federation of India (SFI) या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. SFI च्या कार्यकर्त्यांनी Fadnavis आणि Eknath Shinde यांच्यावर 'नफरतगर्जी' राजकारण करत असल्याचा आरोप करत, अशा लोकांना JNU मध्ये जागा नसल्याचे म्हटले. तसेच, मराठी-हिंदी भाषेच्या वादावरही त्यांनी भाष्य केले. या विरोधावर मुख्यमंत्री Fadnavis यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, "काही लोकांना छत्रपती शिवरायांच्या नावाची अॅलर्जी आहे, पण अशी लोकं बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हा देश कालही शिवरायांच्या नावाने ओळखला गेला. आजही शिवरायांच्या नावाने ओळखला जाईल आणि उद्याही शिवरायांच्या नावानेच ओळखला जाईल. कोणी कितीही त्याला विरोध केला तरीही." भाजप प्रवक्ते Keshav Upadhyay यांनीही या आंदोलनाला डाव्या विद्यार्थी संघटनांचा छुपा अजेंडा म्हटले. त्यांनी आरोप केला की, ही तीच मंडळी आहे ज्यांनी 'देश के टुकडे होंगे' अशा घोषणा दिल्या होत्या आणि अर्बन नक्षलवाद्यांच्या विरोधातील कायद्याला विरोध करत आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्राबाहेर दोन मराठी केंद्रे उभी राहत असताना काही जणांना 'अॅलर्जी' झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















