Mumbai Pune Express Way | "मुंबई-पुणे एक्सप्रेस वे संदर्भात सखोल चौकशी करून अहवाल सादर करा", हायकोर्टाचे कॅगला निर्देश
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे संदर्भात सखोल चौकशी करून अहवाल सादर करा, असे निर्देश हायकोर्टाने कॅगला दिले आहे. मुंबई - पुणे एक्सप्रेस वे संदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारनं मुदतवाढ मागितली आहे. तर तीन आठवड्यात कॅगने तपास करुन नेमके किती पैसे आजवर जमा झालेत आणि किती शिल्लक राहिलेत याचा हिशेब द्यायचा आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील टोल वसुली प्रकरणी हायकोर्टात दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी झाली. कालच्या सुनावणीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील एकूण खर्चावरील काही रक्कम अद्यापही वसूल करणं बाकी आहे यावर कुणी विश्वास ठेवेल का?असा सवाल उपस्थित करत यासंदर्भात कॅगमार्फत चौकशी करण्याचे संकेत हायकोर्टाने दिले होते.





















