India Richest Person : भारतातले टॉप 10 श्रीमंत, गौतम अदानी सर्वात श्रीमंत
India Richest Person : भारतातले टॉप 10 श्रीमंत, गौतम अदानी सर्वात श्रीमंत
अदानी कुटुंबाची संपत्ती 1 वर्षात 95% वाढली:₹11.62 लाख कोटींची संपत्ती, अंबानी कुटुंबाला मागे टाकून भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती एका वर्षात 95 टक्क्यांनी वाढून 11.62 लाख कोटी रुपये झाली आहे. अदानी कुटुंबाने गेल्या एका वर्षात त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये 5,65,503 कोटी रुपयांची भर घातली आहे.
यासह अदानी कुटुंबाने रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी कुटुंबाला मागे टाकून देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब बनले आहे. अंबानी कुटुंबाची संपत्ती 10.15 लाख कोटी रुपये आहे. एका वर्षात 25% वाढ झाली आहे.
'हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024' या अहवालात ही माहिती समोर आली आहे. अहवालात म्हटले आहे की, 'हिंडेनबर्ग आरोपांनंतर फिनिक्सप्रमाणे उगवत, गौतम अदानी आणि कुटुंबाने गेल्या वर्षीच्या तुलनेत संपत्तीत 95% वाढीसह यावर्षीच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.'
एचसीएलचे मालक शिव नाडर आणि कुटुंब 3.14 लाख कोटी रुपये आणि सीरम इन्स्टिट्यूटचे मालक सायरस एस. पूनावाला आणि कुटुंब 2.90 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह यादीत