Indapur Boat Accident : इंदापूर तालुक्यात भीमा नदीपात्रात बोट उलटली , 6 जण बेपत्ता
Indapur Boat Accident : इंदापूर तालुक्यात भीमा नदीपात्रात बोट उलटली , 6 जण बेपत्ता कुगावकडून कळाशीच्या दिशेने जाणारी बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस व जोरदार वारा सुटला. त्यामुळे रौद्ररुप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले व बोट जागेवर फिरली. बोटीत पाणी शिरल्याने दोन चिमुकले सोडून सर्वजण बोटीतून पाण्यात उतरले. त्यावेळी त्या सर्वांनी बोटीला सावरण्याचा प्रयत्न केला. हा जीवन मरण्याचा संघर्ष जवळपास दहा ते १५ मिनिटे सुरू होता. मात्र, जोराच्या वादळामुळे त्यांची झूंज अपयशी ठरली व पाणी शिरलेली बोट पात्रात बुडाली. यावेळी ग्रामीण पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेतील पोलिस उपनिरीक्षक डोंगरे यांनी पोहत पोहत काठ गाठला व स्वतःचा जीव वाचविला. यात बुडालेले प्रवासी गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) व आदिनाथ साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचा तरुण मुलगा गौरव डोंगरे (वय १६) (पोलिस उपनिरीक्षक डोंगरे यांचा चुलत भाऊ)
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d9ea52f1dec8b44d46b9fec7346122601739901030954977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d877e01e65ffa6ad741d16fb30b06fd71739886484727977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/317ce4712984847b3864b7b10235449d1739884286047977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhaji Maharaj Wikipedia | संभाजी महाराजांबाबत विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर, शिवप्रेमींमध्ये संताप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/2a247cc6697d594b2f91b2c8844dc83b1739879233835977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f65ce86b980e3b8da7e5336ea09ecb1a1739878805790977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)