HSC EXAM UPDATE : सध्या दहावीच्या परीक्षा घेणं शक्य नाही,राज्य सरकारचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर
मुंबई : बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय घेणार असून उद्या शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल या संदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घोषणा करण्यापूर्वी शिक्षणमंत्री पंतप्रधान मोदींना या विषीय माहिती देण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यांनी तयार केलेला रिपोर्ट पंतप्रधानांना देण्यात आला आहे. यामध्ये परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट केली जाणार आहे. तसेच 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे विद्यार्थी, केंद्रांमध्ये नेमलेले शिक्षक, कर्मचारी यांना प्राधान्याने लस दिली जाईल. परीक्षा केंद्रावर कोरोना नियमांचे पालन करत परीक्षा घेतल्या जाणार आहे.





















