Nandurbar मध्ये घरोघरी लसीकरण मोहीम, लसीकरणाला गती देण्यासाठी प्रशासनाचं पाऊल
Nandurbar जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढून नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण करण्याचा मानस जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला असून त्यादृष्टीने उपाययोजनाही करण्यात आले आहेत ग्रामीण भागातील लसीकरणासाठी 60 प्राथमिक आरोग्य केंद्र 290 उपकेंद्र यांच्या माध्यमातून पथके तयार करण्यात आली असून ही पथके ग्रामीण भागात घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहेत. दुर्गम भागातील लसीकरणासाठी 750 पथके तयार करण्यात आली असून ही पथके दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवर काही ठिकाणी नावेचा सहाय्याने तर काही ठिकाणी पायपीट करत पोहोचणार आहेत जिल्ह्यातील 650000 नागरिकांच्या लसीकरण या मोहिमेअंतर्गत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या 14 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची संवाद साधल्यानंतर प्रशासनाने लसीकरणासाठी वेग दिला आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण करण्याचा विश्वास नंदुरबारचे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी व्यक्त केला आहे.