एक्स्प्लोर
Maharashtra Rain Superfast News : मुसळधार पाऊस, सुपरफास्ट बातम्या : 22 July 2025 : ABP Majha
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जालना जिल्ह्यातील सावरगाव बुद्रुकमध्ये गौतमी नदीला पूर आल्याने भाजी विक्रेते आणि नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागला. परतूर तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे कसुरा नदीला पूर येऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या. परभणी जिल्ह्यातही कसुरा नदीला पूर आल्याने सेलू पाथरी महामार्ग नऊ तासांपासून बंद आहे. हिंगोलीत बंद आणि बरडा गावांच्या शिवारात पुरामुळे महादेवाच्या मंदिरात अडकलेल्या तिघांची ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्याने सुटका केली. सेनगाव ते साखरा महामार्गावरील वाहतूक बंद पडल्याने सतरा गावांचा संपर्क तुटला. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात टिटवी, कुंडफळ, बोरखेडी, गुंधा हे लघुप्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. बीडच्या माजलगावमध्ये कोथाळा गावच्या सरस्वती नदीला पूर आल्याने कोथाळा आणि सिरसाळा गावाचा संपर्क तुटला. जालना जिल्ह्यातील परतूर आणि मंठा तालुक्यातील सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली, तळणी मंडळात सर्वाधिक १४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अमरावती जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे पुनरागमन झाले. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील चोवीस तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
आणखी पाहा






















