Harbhajan Singh: हरभजनचा सर्व फॉरमॅट्समधून निवृत्तीचा निर्णय ABP Majha
भारताचा ऑफ स्पिनर हरभनजसिंगनं तब्बल २३ वर्षांच्या कारकीर्दीनंतर सर्व फॉरमॅट्समधल्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हरभजननं सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या या निर्णयाची माहिती दिली आहे. भज्जीचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांना भावूक करणारा असला तरी जाणकारांच्या मते तो खूपच उशिरानं घेतलेला निर्णय आहे. कारण गेल्या पाचसहा वर्षांत हरभजननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाही सामन्यात प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यानं २३ वर्षांच्या कारकीर्दीत १०३ कसोटी, २३६ वन डे आणि २८ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. या कारकीर्दीत त्यानं कसोटीत ४१७, वन डेत २६९ आणि ट्वेन्टी ट्वेन्टीत २५ विकेट्स घेतल्या आहेत. भारताच्या २००७ सालच्या ट्वेन्टी ट्वेन्टी आणि २०११ सालच्या वन डे विश्वचषक संघांमध्येही त्याचा समावेश होता.























