(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mhada House: खासगी घरांप्रमाणे म्हाडाच्या घरांमध्ये सुविधा,म्हाडाच्या नव्या घराची झलक 'एबीपी माझा'वर
Goregaon Mhada Room : खासगी घरांप्रमाणे म्हाडाच्या घरांमध्ये सुविधा, म्हाडाच्या नव्या घराची झलक 'एबीपी माझा'वर
म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत जाहीर झाली आहे. ह्या सोडतीत एमआयजी आणि एचआयजी वर्गातील अधिक घरं आहेत. म्हाडाकडून पहिल्यांदाच इमारतीमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, योगा सेंटर, फिटनेस सेंटरसारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न झाला आहे. एखाद्या खासगी विकासकाकडून इमारतीत होतो त्याप्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न म्हाडाकडून केला जात आहे. पहाडी गोरेगावमध्ये मध्यम वर्गातील ही 2बीएचकेची घरं जवळपास १ कोटी १० लाख तर 3बीएचकेची घरं १ कोटी ३३ लाखांमध्ये उपलब्ध करुन दिली आहेत. २बीएचकेमध्ये एरीया ७९४ चौ.फूट तर ३बीएचकेचा एरीया ९७८ चौ. फूट उपलब्ध असणार आहे. दरम्यान, इमारतीचे काम अजूनही निर्माणाधीन असून डिसेंबरपर्यंत सोडतीतील विजेत्यांना घरं उपलब्ध होतील. गोरेगाव परिसरात ३३२ घरं तर पवई परिसरात ४२६ घरं एमआयजी आणि एचआयजीची वर्गातली मुंबईच्या लाॅटरीसाठी उपलब्ध झाली आहे. गोरेगाव परिसरातील घरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी…