(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mosambi : बदलत्या हवामानाचा शेचकऱ्यांना फटका, मोसंबीच्या बागा तोडण्याचा का घेतला शेतकऱ्यांनी कऱ्यांनी निर्णय?
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य शेतकरी हैराण असतानाच अतिवृष्टीचा फटका आता फळबागांना बसतो आहे. औरंगाबाद ,बीड, जालना या भागात मोठ्या प्रमाणावर मोसंबीच्या बागा आहेत. मात्र ,या मोसंबी भागावर अतिवृष्टीमुळे मंगू रोग पडल्याने उत्पादन तर घतलेच आहे शिवाय भावही घसरले आहेत . शेतकऱ्याला प्रति क्विंटल मागे केवळ नऊशे ते हजार रुपये एवढाच भाव मिळतो आहे.
औरंगाबाद बीड आणि जालना या भागाला मोसंबीचा हब म्हणून ओळखले जाते. त्याच मोसंबीचा हब असलेल्या बीड जिल्ह्यातल्या किनगाव मध्ये शेकडो शेतकरी आता आपल्या मोसंबीच्या बागावर अशी कुऱ्हाड चालवत आहेत.बदलते हवामान आणि मोसंबीला मिळणारा कमी भाव त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आणि शेतकऱ्यांनी चक्क मोसंबीच्या बागा तोडण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गावात शेकडो एकरांवर मोसंबीची लागवड करण्यात आली होती त्याच ठिकाणच्या बागा आता अशा जमीनदोस्त झाल्या आहेत.