Mahavikas Aghadi : गुप्तभेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी?, मविआतील नेते म्हणतात...
शरद पवार आणि अजित पवारांमधील मविआतल्या गाठी उसवण्याची शक्यता आहे... शरद पवार आणि अजित पवारांमधील गुप्त भेट आणि त्यानंतरचा ड्रामा यामुळे मविआमध्ये संशयाचे ढग दाटू लागलेत... शरद पवार आणि अजित पवारांनी जरी भेटीवर स्पष्टीकरण दिलं असलं तरी काँग्रेस आणि शिवसेनेचा विश्वास राहिलेला नाही... आणि त्यामुळेच ठाकरे गट आणि काँग्रेस शरद पवारांशिवाय आगामी निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीये... त्यामुळे आता काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय... आगामी निवडणुकांच्या समीकरणांबाबत दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यात बैठक झाली या बैठकीत काँग्रेस आणि ठाकरे गटाने प्लॅन बी तयार केला असल्याची माहिती मिळतेय.. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने सर्वच लोकसभा मतदारसंघांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे..