Disha salian Case : लवकरच सत्य बाहेर येईल Rahul Shewale यांची प्रतिक्रिया ABP Majha
Disha salian Case : दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन होणार, राज्य सरकारचे लेखी आदेश, लवकरच सत्य बाहेर येईल Rahul Shewale यांची प्रतिक्रिया ABP Majha
Disha Salian Death Case SIT: राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणी (Disha Salian Case) अखेर एसआयटी स्थापन केली जाणार आहे. राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. दरम्यान, गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. अखेर आज मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश देण्यात आले आहेत.
CBI नं दिलेली क्लिन चीट
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू होता. पण सीबीआयनं या प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही, दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला आहे, असा निष्कर्ष तपासाअंती काढला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयनं वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आलं होतं. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला, असं सीबीआय तपासात समोर आलं होतं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं हा निष्कर्ष काढला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.