Dharashiv Madhukar Chavan : तुळजापूरचे धोतर,जनता विधानसभेवर पाठवणारच
Dharashiv Madhukar Chavan : तुळजापूरचे धोतर,जनता विधानसभेवर पाठवणारच
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. पाच वेळा विधानसभेवर आमदार म्हणून गेलेले मधुकर चव्हाण यावेळी अपक्ष म्हणून विधानसभा मतदारसंघात आहेत. सत्तर वर्ष मी पक्षाची सेवा केली माझ्या घराची राखरांगोळी करू नका असं मी पक्षाला सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. जनता माझ्या पाठीशी आहे. अनेकांच्या घरात दोन पक्ष आहेत. मात्र माझ्यावर टीका होतेय. मी लढणार आणि जिंकणार असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. मी पैलवान आहे, तुळजापूरच हे धोतर विधानसभेवर जाणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मधुकर चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
