एक्स्प्लोर
Lokmangal Bank : लोकमंगल बँक चोरीचा छडा, शिपाईच निघाला चोर
धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील तुळजापूर (Tuljapur) येथील लोकमंगल बँकेतील (Lokmangal Bank) चोरीचा अखेर दोन महिन्यांनी उलगडा झाला असून, बँकेचा शिपाई दत्ता कांबळे (Datta Kamble) यालाच या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 'आमची जी टीम आहे त्यांनी खूप मेहनत घेऊन अथक प्रयत्न करून दोन महिन्यांमध्ये त्याला अटक केली आणि त्याच्याकडून तपासादरम्यान आम्ही दोन किलो एकशे पन्नास ग्राम सोनं आणि अकरा लाख रुपये कॅश जप्त केलेलं आहे,' अशी माहिती पोलिसांनी दिली. दोन महिन्यांपूर्वी बँकेतून ३४ लाख ६० हजार रुपये आणि दोन किलोपेक्षा जास्त सोनं चोरीला गेलं होतं. यानंतर, धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने नागपूरमध्ये (Nagpur) ही कारवाई करत आरोपी दत्ता कांबळेच्या मुसक्या आवळल्या. आरोपीने बँकेची डुप्लिकेट चावी वापरून ही चोरी केल्याची कबुली दिली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















