Devendra Fadnavis Raksha Bandhan : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शेतमजूर महिलेने बांधली राखी
Devendra Fadnavis Raksha Bandhan : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शेतमजूर महिलेने बांधली राखी
विद्या धुमाळ म्हणतात, साहेब ही गरिबा घरची राखी आहे... देवेंद्र फडणवीस म्हणाले, तीच महत्त्वाची आहे... - विजय धुमाळ यांच्या पत्नी विद्या धुमाळ यांनी बांधली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी - विजय धुमाळ हे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांडा येथील रहिवासी. 41 वर्षांचे आहेत... - विजय धुमाळ यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यामुळे त्यांचे हृदय प्रत्यारोपण करावे लागले. त्यांच्या उपचाराचा संपूर्ण 23 लाख रुपये खर्च हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत करण्यात आला. - विजय धुमाळ हे बांधकाम मजूर असून, त्यांची पत्नी विद्याताई या शेतमजूर आहेत. या कुटुबांचे उत्पन्न वार्षिक अवघे 31 हजार रुपये. त्यामुळे त्यांना उपचारापासून वंचित रहावे लागले होते. - भाजपाच्या एका कार्यकर्त्याने देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला आणि देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ या कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांना उपचार मिळवून देण्याच्या सूचना केल्या. धर्मदाय आरोग्य कक्ष हा विधी व न्याय विभागांतर्गत काम करतो. - धुमाळ दामत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत हे कुटुंब जीवन जगते. अशात या आरोग्याच्या संकटाने ते पूर्णत: कोलमडून गेले होते. त्यांना नगरमधील मोरया क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय सहायता कक्षाने त्यांना रुबी क्लिनीक पुणे येथे हलविले आणि तेथे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. आता त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. - काल रात्री त्यांच्या पत्नीने देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली.