Devendra Fadnavis Nagpur : नितीन गडकरी , देवेंद्र फडणवीसांकडून नागपूरच्या विकासकामांचा आढावा
Devendra Fadnavis Nagpur : नितीन गडकरी , देवेंद्र फडणवीसांकडून नागपूरच्या विकासकामांचा आढावा
शेतकर्यांना (Farmers) दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत, राज्यात 9 हजार 200 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यापैकी 3 मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे 1 हजार 753 शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या महत्वाकांशी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री तथा राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. हा जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. धोंदलगाव प्रकल्पाची ही सुरुवात आहे. या वर्षी मार्चमध्ये प्रदान केलेल्या 9 हजार 200 मेगावॅट विकेंद्रित सौर प्रकल्पांचा हा एक भाग आहे. प्रकल्पांतर्गत संपूर्ण क्षमता डिसेंबर 2025 पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले आहे.