Devendra Fadnavis Letter : फडणवीसांच्या पत्राला शिंदेंच्या शिवसेनेचं समर्थन
Devendra Fadnavis Letter : फडणवीसांच्या पत्राला शिंदेंच्या शिवसेनेचं समर्थन देवेंद्र फडणवीस हेच पत्र न लिहिता.. आपली भूमिका थेट अजित पवारंना सांगू शकले असते.. मात्र, त्यांनी हा पत्र प्रपंच करत.. फक्त अजित पवारांनाच नाही विरोधकांसह मित्रपक्षांनाही एक संदेश दिलाय.. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राला महायुतीतील मित्रपक्ष शिवसेनेनं समर्थन दिलंय. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका पुढे यायची आहे.. एबीपी माझाशी बोलताना त्यांचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी बाजू मांडलीय.. मात्र, अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. असं असलं तरी विरोधकांना मात्र, सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यासाठी आयतीच संधी मिळालीय























