एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Full Speech Jalgaon : महिला एकही रुपया बुडवत नाही..नरेंद्र मोदींसमोर धमाकेदार भाषण

Devendra Fadnavis Full Speech Jalgaon : महिला एकही रुपया बुडवत नाही..नरेंद्र मोदींसमोर धमाकेदार भाषण 

सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची मदत दिली जाणार आहे. अशाच प्रकारची योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आली होती. सध्या एकूण सात राज्यांत महिलांना आर्थिक स्वरुपात मदत करणाऱ्या अशाच प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. एकीकडे लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळालेली असताना आता केंद्र सरकारची लखपती दीदी ही योजनेदेखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे?  या योजनेचे स्वरुप काय आहे? हे जाणून घेऊ या....   योजनेचा उद्देश काय?  केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तिकरणावर सरकारचा विशेष भर आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सरकातर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.     पाच लाख रुपयांपर्यंत मिळणार मदत ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाते. महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, असाही उद्देश या योजनेमागे आहे. या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.   योजनेच्या लाभासाठी नेमकी अट काय?  या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.  योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा?  लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल. या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल. या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल. त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Aaditya Thackeray Worli :काही एकरातले कोळीवाडे एक दोन बिल्डिंगमध्ये डांबण्याचा शिंदेंचा प्रयत्न
Aaditya Thackeray Worli :काही एकरातले कोळीवाडे एक दोन बिल्डिंगमध्ये डांबण्याचा शिंदेंचा प्रयत्न

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu : लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, लाडकी बहीणचं तुम्हाला धडा शिकवेल, बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार
लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार
मी संधीसाधू तर शरद पवार कोण?; अशोक चव्हाणांचा प्रतिसवाल, जरांगेंच्या भूमिकेवरही परखड मत
मी संधीसाधू तर शरद पवार कोण?; अशोक चव्हाणांचा प्रतिसवाल, जरांगेंच्या भूमिकेवरही परखड मत
Bhosri Vidhansabha election 2024 : भोसरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा भाजपकडून महेश लांडगेंना संधी; MVA कडून शरद पवारांच्या पक्षाने दिली अजित गव्हाणेंना संधी
भोसरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा भाजपकडून महेश लांडगेंना संधी; MVA कडून शरद पवारांच्या पक्षाने दिली अजित गव्हाणेंना संधी
Sudhir Mungantiwar : पाप केल्यावर कोविड होतो, त्यांच्या पक्ष प्रमुखांना पण कोविड झाला होता : सुधीर मुनगंटीवार
पाप केल्यावर कोविड होतो, त्यांच्या पक्ष प्रमुखांना पण कोविड झाला होता : सुधीर मुनगंटीवार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray Worli :काही एकरातले कोळीवाडे एक दोन बिल्डिंगमध्ये डांबण्याचा शिंदेंचा प्रयत्नABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 10 November 2024Narendra Modi on Rahul Gandhi : राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेचं कौतुक करुन दाखवावंManoj Jarange Full PC:  मविआ , महायुती ,अपक्ष कोणालाही माझा पाठिंबा नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bacchu Kadu : लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, लाडकी बहीणचं तुम्हाला धडा शिकवेल, बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार
लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार
मी संधीसाधू तर शरद पवार कोण?; अशोक चव्हाणांचा प्रतिसवाल, जरांगेंच्या भूमिकेवरही परखड मत
मी संधीसाधू तर शरद पवार कोण?; अशोक चव्हाणांचा प्रतिसवाल, जरांगेंच्या भूमिकेवरही परखड मत
Bhosri Vidhansabha election 2024 : भोसरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा भाजपकडून महेश लांडगेंना संधी; MVA कडून शरद पवारांच्या पक्षाने दिली अजित गव्हाणेंना संधी
भोसरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा भाजपकडून महेश लांडगेंना संधी; MVA कडून शरद पवारांच्या पक्षाने दिली अजित गव्हाणेंना संधी
Sudhir Mungantiwar : पाप केल्यावर कोविड होतो, त्यांच्या पक्ष प्रमुखांना पण कोविड झाला होता : सुधीर मुनगंटीवार
पाप केल्यावर कोविड होतो, त्यांच्या पक्ष प्रमुखांना पण कोविड झाला होता : सुधीर मुनगंटीवार
Election 2024: व्हॅनमध्ये तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा, पोलिसांच्याही भुवया उंचावल्या; पाहा फोटो
Election 2024: व्हॅनमध्ये तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा, पोलिसांच्याही भुवया उंचावल्या; पाहा फोटो
Amit Shah : ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचा मविआचा घाट; अमित शाहांचा गंभीर आरोप
ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचा मविआचा घाट; अमित शाहांचा गंभीर आरोप
Dhananjay Mahadik : लाडक्या बहिणींना जाहीर धमकी, खासदार धनंजय महाडिकांच्या अडचणी वाढल्या! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींना जाहीर धमकी, खासदार धनंजय महाडिकांच्या अडचणी वाढल्या! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
Embed widget