एक्स्प्लोर
Cough Syrup Deaths | नागपुरात FDA अलर्ट, १७ बालकांच्या मृत्यूने खळबळ
देशभरात १७ बालकांचा कप सिरपमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर नागपूरमधील अन्न आणि औषध प्रशासन (FDA) सतर्क झाले आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये तामिळनाडूच्या एका कंपनीने पुरवलेल्या औषध साठ्यात भेसळ आढळल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, नागपुरातील एका स्टॉकिस्टकडे असलेल्या कप सिरपच्या साठ्याबद्दल अन्न आणि औषध प्रशासन विभागाला संशय आहे. विभागाने काही स्टॉकिस्टकडे चौकशी करून कप सिरपच्या साठ्याची तपासणी केली. संशयाच्या आधारे, या कप सिरपचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तपासणीचा अहवाल येईपर्यंत संबंधित स्टॉकिस्टला हे कप सिरप विक्री करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. या कप सिरपच्या तपासणीचा अहवाल काय येतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















