Congress Hai Taiyaar Hum Rally : नागपुरात काँग्रेसच्या 'है तय्यार हम' महारॅलीची जोरदार तयारी
Congress Hai Taiyaar Hum : नागपुरात काँग्रेसच्या 'है तय्यार हम' महारॅलीची जोरदार तयारी
काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त उद्या नागपुरात काँग्रेसची "है तयार हम" अशी महारॅली होणार आहे. या महारॅलीची तयारी अंतिम टप्प्यात आलीये.. तयारीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या बैठकाही आज दिवसभर सुरू राहणार आहेत...सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गेंच्या उपस्थितीत महारॅलीला सुरुवात होईल. दरम्यान याच दिवसाचं निमित्त साधत काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं रणशिंगही फुंकणार आहे. रॅलीनिमित्त काँग्रेसचे अनेक नेते नागपुरात दाखल होण्यास सुरुवात होईल. या सभेसाठी 600 आसनव्यवस्थेचं भव्य व्यासपीठ साकारण्यात आलंय. संपूर्ण मैदानात दोन लाख कार्यकर्त्यांना बसता येईल अशी व्यवस्था करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या





















