CM Eknath Shinde Raigad : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर एकनाथ शिंदेंची हजेरी
CM Eknath Shinde Raigad : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर एकनाथ शिंदेंची हजेरी संपूर्ण महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे प्रेरणास्थान आहेत. शिवरायांच्या पराक्रमाची गाथा संपूर्ण महाराष्ट्र 350 वर्षांपासून ऐकतोय, गातोय. त्यामुळे महाराष्ट्रासाठी शिवजंयती त्याचप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन हे दिन अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यातच यंदा शिवराज्याभिषेकाला यंदा 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे शिवभक्तांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. यानिमित्ताने रायगडावरही तयारी पूर्ण झाली आहे. अखंड महाराष्ट्राच्या मनामनात आणि इथल्या भूमीच्या कणाकणात महिरपी रुपात कोरलेला अभिमानास्पद क्षण म्हणजे जाणता राजा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. सूर्यदेवाने कुर्निसात करत, चंद्रमौळी किरणांचा वर्षाव अवघ्या राज्याभिषेकावर केला. या घटनेला आता 349 वर्षे सरली. मात्र आजही या सोहळ्याचं तेज उत्तरोत्तर वाढत गेलं. अजूनही ही मराठमोळी धरणी या क्षणांच्या आठवणींनी मोहरून जाते. दुर्गराज रायगडवर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो.
![NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/ebba958da864f17cdf61f5eb1e96efdd1739703745635718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/34d86dfb433da2bf76b2559a05a98a721739703399881718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f1f0444cd99d708a7b5171e65487bb8b1739697620703976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhajinagar Robbery CCTV : चोरट्यांनी CCTV वर स्प्रे मारला,नंतर ATM फोडलं, 13 लाख लंपास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/8707373714b68ffdd9e66658c40ccdfb1739694324067976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 16 February 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/53668dffb85b3742c672a1eda65b78521739693655706976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)