एक्स्प्लोर
CJI Attack Attempt | सरन्यायाधीश BHUSHAN GAVAI यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, राज्यभरात निषेध
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यभरात आज आंदोलन करण्यात आले. मुंबईमध्ये काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये या हल्ल्याच्या विरोधात आंदोलन झाले. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनीदेखील निषेध व्यक्त केला. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीने आंदोलन केले. अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देखील आंदोलन करण्यात आले. वकील संघाकडूनही या घटनेचा निषेध करत सभा घेण्यात आली आहे. या घटनेमुळे न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सर्व स्तरांतून या कृतीचा निषेध केला जात आहे. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















