Uddhav Thackeray on Government : कर्नाटक सीमावादावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मौन बाळगल्याचा आरोप
येत्या १७ डिसेंबरला मुंबईत आयोजित महामोर्चाच्या निमित्तानं मविआची दुसरी बैठक आज पार पडली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या उपस्थितीत महामोर्चाचं महाप्लॅनिंग करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होणारा अपमान, महाराष्ट्रातून बाहेर जाणारे प्रकल्प, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीनं राज्य सरकारविरोधात मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चासाठी विविध राजकीय पक्षांसह महाराष्ट्रप्रेमी संघटनांनीही उपस्थित राहावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केलं. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर कोणतीही भूमिका न घेण्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवरही ठाकरेंनी टीका केली.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
