Chhattisgarh Naxal : सुरक्षा दल - नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 8 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
Chhattisgarh Naxal : सुरक्षा दल - नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 8 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
Chhattisgarh Naxal : छत्तीसगढमधील (Chhattisgarh) नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाड भागातून मोठी बातमी समोर आली आहे. यात सुरक्षा रक्षकांची नक्षलवाद्यांशी (Naxlite) मोठी चकमक झाली आहे. या चकमकीत आतापर्यंत 8 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या परिसरात अद्याप पोलिसांची नक्षलवाद्यांशी चकमक सुरू असून नक्षलवाद्यांच्या (Naxal) मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे या अंधाधुंद गोळीबारात एसटीएफचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्याची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. सध्या परिसरात अजून ही अभियान सुरू असल्यानें मारले गेलेल्या नक्षल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नक्षल्यांच्या गड असलेल्या अबुझमाडच्या कुतुल, फरसाबेदा, कोडामेटा परिसरात मागील दोन दिवसांपासून संयुक्त नक्षलविरोधी अभियान सुरू आहे. या अभियानात नारायणपूर-कोंडागाव-कांकेर-दंतेवाडा दीआरजी (DRG), एसटीएफ (STF) आणि आयटीबीपी (ITBP) 53व्या कॉर्प्स या संयुक्त कारवाईत सामील आहेत. सध्याघडीला जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरूच असून पोलिसांच्या कारवाईला अद्याप 8 नक्षलवाद्यांचा खात्म करण्यात पोलिसांना यश आले आहे.