(Source: Poll of Polls)
Chhagan Bhujbal Maharashtra Sadan Ghotala:भुजबळांसह निर्दोषमुक्त केलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस
भुजबळांसह निर्दोषमुक्त केलेल्या इतर आरोपींना हायकोर्टाची नोटीस चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना मनी लाँड्रींग प्रकरणातून निर्दोष सोडल्याविरोधात अंजली दमानिया हायकोर्टात मुंबई विशेष सत्र नन्यायाधीश सातभाई यांनी पुराव्यांकडे दुर्लक्ष करून भुजबळांना दिलासा दिल्याचा दमानियांकडून आरोप साल 2021 मध्ये मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं ठराविक आरोपींना डिस्चार्ज केल्याविरोधात याचिका अँटी करप्शन ब्युरोमध्ये जी केस दाखल होती ती अंजली दमानिया आम आदमी पार्टीत असताना दाखल झालेल्या PIL वर आधारावर होती याच प्रकरणांत कोर्टानं SIT चौकशीचे आदेश दिले होते SIT स्थापन झाल्यानंतर गुन्हा नोंदवला गेला, ज्यावर ईडी कडून देखील ईसीआयआर दाखल करण्यात आलाय या एसीबीच्या मूळ केसमध्ये आरोपींना डिस्चार्ज करण्यात आलय याविरोधात मूळ याचिकाकर्ता यानात्यानं दमानिया यांनी पुनर्विचार याचिका दाखल केलीय हायकोर्टानं यावर आता भुजबळंसह इतर सर्व आरोपींना नोटीस जारी केली आहे याचप्रकरणी सहआरोपी दिपक देशपांडेंना अद्याप दोषमुक्त केलेलं नाही दिपक देशपांडे तत्कालीन बांधकाम विभाग सचिव होते त्यांनी दाखल केलेल्या दोषमुक्तीच्या याचिकेवर दोन आठवड्यात सुनावणी होईल