Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या कार्यकाळातील कामांचं केंद्राकडून ऑडिट ABP Majha
ठाकरे विरुद्ध मोदी सरकार हा वाद राज्यात पुन्हा रंगण्याची चित्र दिसतायतत... कारण माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळातील कामाचं आता केंद्रीय पर्यावरण खात्याकडून ऑडिट सुरू करण्यात आलंय... यात विशेषतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा कारभार केंद्रस्थानी आहे. मुंबईतील मुख्यालयापासून पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड आदी विभागांतील कार्यालयात हे केंद्रीय ऑडिट सुरू करण्यात आले आहे. दरम्यान ऑडिटमध्ये कोणत्या नव्या सूचना करण्यात आल्या तर स्वागत असेल मात्र उगाच बदनामीचे धनी करू नये अशी अपेक्षा प्रदूषण मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी व्यक्त केलेय.






















