KCR in Pandharpur : बीआरएसच्या विस्तारासाठी एकादशीचा मुहूर्त, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी नाकारली
तेलंगणाचं अख्खं मंत्रिमंडळ कालपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तेलंगणातून तब्बल ६०० गाड्यांचा ताफा आज महाराष्ट्रात दाखल झालंय. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सध्या सोलापुरात आहे... त्यांचं सोलापुराच स्वागत करण्यात आलंय.. महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मोठा विस्तार करण्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची योजना आहे.. उद्या केसीआर पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. केसीआर यांच्यासोबत मंत्री आणि महत्वाचे व्यक्ती असे १३० लोक दर्शन घेणार असल्याची माहिती आहे..
आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी सुरू झालेल्या केसीआर यांच्या या दौऱ्याला मोठं महत्व प्राप्त झालंय..केसीआर यांच्या दौऱ्यात तेलंगणाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि इतर नेते सहभागी आहेत.. दरम्यान विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद असल्यानं फक्त मुख्यमंत्री केसीआर यांनाच उद्या व्हीआयपी दर्शन देण्यात येणार आहे... इतर मंत्री, आमदार, खासदार यांना मात्र व्हीआयपी दर्शन घेता येणार नाही, मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय... दुसरीकडे हेलिकॉप्टरने करण्यात येणाऱ्या पुष्पवृष्टीलाही प्रशासनाने परवानगी नाकारल्यानं बीआरएसनं नाराजी दर्शवलीए
![Paragliding For exam : पेपरला उशीर, घाटात ट्रॅफिक जॅम; पॅराग्लायडिंगने पोहोचला परीक्षा केंद्रावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/47ba05a78afd430f2b3c42cff96215f81739783831287718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Vaibhav Naik Meets Uddhav Thackeray : वैभव नाईक मातोश्रीवर, ठाकरेंसोबत करणार चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e43b3f3b5034a16720efff9e8bc4735a1739783504971718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/abd183f75c46d10ac8478e8ac93c6e561739780130177718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/03af2fa192bc24d5abfaf4f12411a47a1739774076771718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/5b0a833b491ef0e60b3cbd6f96157a5a1739770016279718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)