BMC Workers beaten : ठाकरे गटातल्या कार्यकर्त्यांची पालिका कर्मचाऱ्याला मारहाण, अनिल परबांवर गुन्हा दाखल
ठाकरे गट १ जुलै रोजी मुंबई महापालिकेविरोधात मोर्चा काढणार आहे. त्याच्या तयारीसाठी मुंबईतील सर्व शाखाप्रमुखांची शिवाजी मंदिरात थोड्याच वेळात आढावा बैठक होतेय. त्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरेे शाखाप्रमुखांना संबोधित करणार आहेत. शिवाय आगामी महापालिका निवडणुकीविषयी देखील ते मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, याच बैठकीत मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचारासंदर्भात आदित्य ठाकरे सादरीकरण करणार आहेत. या बैठकीमागे आणखी एक कारण सांगितलं जातंय. मुंबईतील माजी नगरसेवकांचं शिंदे गटात होणारं आउटगोइंग थांबवण्यासाठी देखील ठाकरे गट विशेष खबरदारी घेतोय, आणि त्या पार्श्वभूमीवर शाखाप्रमुशांशी संवाद वाढवण्याचा हा प्रयत्न आहे, असंही बोललं जातंय.























