एक्स्प्लोर
Defender Politics: शिवसेनेच्या मंत्र्यांना दीड कोटींच्या रेंज रोव्हर 'डिफेंडर'ची भुरळ?
बुलढाण्यात शिवसेना (Shiv Sena) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि भाजप (BJP) जिल्हाध्यक्ष विजय शिंदे (Vijay Shinde) यांच्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. 'आमदार गायकवाड यांना दीड कोटींची डिफेंडर गाडी कोणत्या कामाच्या कमिशनमुळे मिळाली?', असा थेट सवाल शिंदे यांनी केला आहे. या आरोपानंतर राजकीय वातावरण तापले असून, गायकवाड यांनी ही गाडी एका कंत्राटदाराची असून तो आपला नातेवाईक असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. हा वाद केवळ गायकवाड यांच्यापुरता मर्यादित नाही, तर संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि खासदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याकडेही अशाच महागड्या गाड्या असून त्यांचे मालक अनुक्रमे सागर पवार आणि संजय भंडारी नावाच्या व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















