एक्स्प्लोर
Bhaskar Jadhav Allegations | मुंबईतील मेळाव्यात भास्कर जाधवांची ब्राम्हण समाजावर थेट टीका
थाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी मुंबईतील शिवसेना भवनात गुहागरमधील मुंबईवासियांच्या मेळाव्यात बोलताना अनेक गौप्यस्फोट केले. २०२४ च्या निवडणुकीच्या प्रचारावेळी जातीवाचक बोलल्याचा ठपका ठेवत आपल्या अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांनी दबाव आणला होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला. ब्राह्मण समाजावरही त्यांनी टीका केली. ब्राह्मण समाज पाताळयंत्री असून समाजात तेढ निर्माण करणारा अनाजीपंत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. कुणबी समाजाला इशारा देताना ते म्हणाले, "सावध व्हा, हा शेवटचा वार आहे, मी बाजूला झालो तर तुम्हाला गिळून टाकतील." त्यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















