(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Atal Setu Special Report : कसा आहे शिवडी - न्हावा शेवा सागरी सेतू ?
Atal Setu Special Report : कसा आहे शिवडी - न्हावा शेवा सागरी सेतू ?
महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Trans Harbour Link) प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतूचे (Nhava Sheva Atal Setu- MTHL) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) हस्ते उद्घाटन होणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा ट्रान्स हार्बर लिंक हा अभियांत्रिकी चमत्कार म्हणावा, असा आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू शिवडी इथून सुरू झाला ज्या ठिकाणावरून एमटीएचएलची सुरुवात होते. हा रस्ता शिवडी येथून थेट समुद्रमार्गे चिरले गावी म्हणजेच न्हावा शेवापर्यंत जातो. एकूण 22 किमीचा हा मार्ग असून त्यातील 16.80 किमी रस्ता समुद्रातून आहे. हा भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पूल असून जगात हा 12 व्या स्थानी आहे. सध्या या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, काही ठिकाणी छोटे मोठे काम सुरू आहे.
तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईसह, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटांवर आणणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी मैलाचा दगड म्हणजे हा प्रकल्प असेल.