एक्स्प्लोर
ASI Restoration: आठव्या ज्योतिर्लिंगाच्या शिवलिंगाची झीज रोखण्यासाठी रासायनिक लेप, औंढा नागनाथ येथे काम सुरू
हिंगोलीतील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिराच्या दुरुस्ती आणि संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व विभागाने (ASI) हाती घेतले आहे. विशेषतः शिवलिंगाची झीज होऊ नये, यासाठी त्यावर खास रासायनिक लेप लावण्यात येत असल्याची माहिती आहे. मंदिराचे हेमाडपंती वास्तुशिल्प आणि प्राचीन वारसा जपण्यासाठी हे काम अत्यंत काळजीपूर्वक केले जात आहे. मंदिराच्या शिखरावरील जुने बांधकाम काढून रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमातून मंदिराचे आयुष्य वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुरातत्व विभागाच्या या कामामुळे मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व पुढच्या पिढ्यांसाठी टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















