Coromandel Express Accident : अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश : Ashwini Vaishnaw
Coromandel Express Accident : अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश : Ashwini Vaishnaw
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात भीषण रेल्वे अपघात झाला, यामध्ये २३३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ९००हून अधिक जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ७च्या सुमाराला ही दुर्घटना घडली. हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले होते. यात कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र काही क्षणांतच या घसरलेल्या डब्यांवर समोरून येणारी ट्रेन धडकली, आणि मग मृत्यूचं तांडवच सुरू झालं. यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट ट्रेनच्या चालकाला जवळच घडलेल्या अपघाताबाबत माहित नसावं. म्हणून त्याची ट्रेन पूर्ण वेगात होती. आणि हीच ट्रेन घसरलेल्या डब्यांवर जाऊन आदळली. शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. NDRFच्या चार तुकड्या, ३० डॉक्टर, २०० पोलीस कर्मचारी आणि ६० रुग्णवाहिका घटनास्थळी आहेत. ओडिशा सरकारचे अनेक मंत्री देखील काल रात्रीच अपघाताच्या ठिकाणी दाखल झाले. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर गंभीर जखमींना २ लाखांचं सहाय्य केलं जाणार आहे.