Ashok Chavan Profile : 29व्या वर्षी खासदार, 34 व्या वर्षी मंत्री अशोक चव्हाण यांचा संपूर्ण प्रवास!
अशोक चव्हाण...राजकारणात अशोक चव्हाण म्हणजे नांदेड आणि नांदेड म्हणजेच अशोक चव्हाण...28 October 1958 रोजी Shankarrao Chavan आणि Kusumbai Chavan यांच्या घरात एका बाळाचा जन्म झाला..ते बाळ म्हणजे अशोक शंकरराव चव्हाण!
अशोकरावांचा जन्म झाला तेव्हा शंकरराव चव्हाण हे राज्यात आमदार होते...अशोक चव्हाण यांनी दक्षिण मुंबईच्या St. Xavier's शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं... पुढे त्यांनी सायंन्समधून ग्रॅजुएशन केलं...आणि Hazarimal Jomani College मधून Business Management मध्ये मास्टर्स पूर्ण केलं...अशोक चव्हाण 28 वर्षांचे असताना...त्यांचे वडील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.... त्यामुळे...तरुणपणात त्यांनी राजकारण अगदी जवळून अनुभवलं...
अशोक चव्हाणांनी सुद्धा त्यांच्या पॉलिटिकल करिअरची सुरुवात पुणे विद्यापिठात विद्यार्थी चळवळीतून एक केली... वयाच्या 29 व्या वर्षी म्हणजे 1987 साली त्यांना पहिला जॅकपॉट लागला...त्यावर्षी नांदेड लोकसभेची पोडनिवडणूक लागली होती आणि काँग्रेसनं थेट शंकररावांच्या लेकाला निवडणूकीत उतरवलं...अशोक चव्हाणांची ही पहिली निवडणूक! त्या निवडणुकीत 2,83,019 मतं मिळवत त्यांनी विरोधकांचा धुरळा उडवला आणि लोकसभेचे खासदार झाले...
पुढे 1989 च्या लोकसभेत आणि 1990 च्या विधानसभेत अशोक चव्हाणांना डच्चू मिळाला...त्यांना काँग्रेसनं तिकीट दिलं नाही...पण 1992 साली त्यांना पुन्हा जॅकपॉट लागला आणि यानंतर अशोक शंकरराव चव्हाण ही गाडी कधीच थांबली नाही...1992 साली अशोक चव्हाणांना काँग्रेसनं राज्यसभेवर पाठवलं...ते पुन्हा आमदार झाले...पण यंदा त्यांचं नशिब चमकलं होतं...त्यांना थेट मंत्री केलं...वयाच्या 34 व्या वर्षी अशोक चव्हाण मंत्री झाले...नगर विकास, सार्वजनिक बांधकाम आणि होम अशी तिन खाती त्यांच्याकडे होती...यानंतर अशोक चव्हाण यांची घौडदौड सुरू झाली...पुढे 2003 आणि 2004 दरम्यान त्यांनी अनेक मंत्रिपद भुषवली...त्या करिअरचा सोनेरी काळ उजाडला तो 2008 साली...त्या साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता...हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख...फिल्म डिरेक्टर राम गोपाल वर्माला ताज हॉटेलमध्ये पाहणीसाठी घेऊन गेल्याचे आरोप झाले...तसे फोटोही समोर आले...आरोपांच्या फैरिंनंतर विलासरावांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला...आता कुणाला मुख्यमंत्री करायचं असा प्रश्न काँग्रेस हायकमांडला पडला आणि सोनिया गांधींना एक नाव सुचलं...अशोक शंकरराव चव्हाण! नावावर शिक्कामोर्तब झाला आणि अशोक चव्हाण पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले!
पुढच्या वर्षी 2009मध्ये पुन्हा विधानसभा लागली...राज्यात काँग्रेसची सत्ता आली आणि अशोक चव्हाण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले...पण हा आनंद फार काळ टीकला नाही...अशोक चव्हाणांवर 2009 - 2010 च्या दरम्यान आदर्श घोटाळ्याचे आरोप झाले...विरोधकांनी इतलं प्रेशर दिलं की अशोक चव्हाणांना वर्षभरातच राजीनामा द्यावा लागला...
त्यानंतर अशोक चव्हाणांवर पक्षांतर्गत जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या...2014 ते 2019 दरम्यान ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष राहिले...2014 साली काँग्रेसचं सरकार गेलं तेव्हा ते आमदार होते तर 2019 साली मविआच्या सत्तेत ते पुन्हा मंत्री झाले...
पण आता मात्र...चव्हाणांनी आपला ट्रॅक बदललाय...गेली 70 ते 80 वर्ष चव्हाण कुटुंबाचं काँग्रेसशी नातं होतं...त्या नात्यावरच चव्हाणांनी वार करत आता बाहेरची वाट धरलीये...जन्मापासूनच अशोक चव्हणांवर काँग्रेसचे संस्कार झालेत...त्यामुळे आता हे नवे संस्कार ते कसो जोपासतील हे पाहण्यासारखं असेल...