एक्स्प्लोर
Arun Gawli : 'डॅडी'चा अंडरवर्ल्ड ते आमदार प्रवासाचा फ्लॅशबॅक Special Report
अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी आमदार अरुण गवळी तब्बल अठरा वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. नागपूर कारागृहाच्या मागच्या गेटमधून त्याला गुपचूप बाहेर काढण्यात आले. नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने अरुण गवळीची सुटका झाली. तो नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. 2 मार्च 2007 रोजी शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या झाली होती. या हत्येची सुपारी 30 लाखांना दिल्याची माहिती समोर आली होती. अरुण गवळीला अटक झाली तेव्हा तो अखिल भारतीय सेनेचा आमदार होता. मुंबई अंडरवर्ल्डमध्ये 'डॅडी' या नावाने प्रसिद्ध असलेला अरुण गवळी दाऊद टोळीला तोडीस तोड टक्कर देत होता. दाऊद, शकील, राजन देशाबाहेर पळून गेले, मात्र गवळी मुंबईतच राहून कारवाया करत होता. रमा नाईक आणि अरुण गवळी यांनी 'बी आर ए गँग' तयार केली होती. दाऊदशी उघड शत्रुत्व घेतल्यानंतर गवळीने त्याच्या टोळीतील अनेकांना संपवले. 1992 मध्ये गवळीने दाऊदची बहीण हसीना पार्करचा नवरा इस्माईल पार्करला मारले होते. त्यानंतर दाऊदने गवळीचा भाऊ किशोर म्हणजेच पप्पा गवळीला संपवले. गवळीने रियल इस्टेट आणि मटक्यातूनही पैसा कमावला. शिवसेनेतून पाठिंबा न मिळाल्याने त्याने अखिल भारतीय सेनेची स्थापना केली. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत तो चिंचपोकळी मतदारसंघातून निवडून आला होता. 2007 च्या जामसांडेकर हत्याप्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि 2008 पासून तो जेलमध्ये होता. आता वयाच्या 70 व्या वर्षी त्याला जामीन मिळाला आहे.
महाराष्ट्र
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
छत्रपती संभाजी नगर
भारत






















