(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shailaja Darade : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडेंवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांच्यावर कायमस्वरूपी नोकरीचे अमिष दाखवून शिक्षकांकडून लाखो रुपये उकळल्याबद्दल पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. शिक्षण संचालक म्हणून कार्यरत असताना 2019 साली त्यांनी राज्यातील 45 शिक्षकांकडून प्रत्येकी 12 ते 14 लाख रुपये घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. डी .एड. झालेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी 12 तर बी. एड. झालेल्या शिक्षकांकडून 14 लाख रुपये शैलजा दराडे या त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे मार्फत घेत होत्या असा त्यांच्यावर आरोप आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे दोन अध्यक्ष टी ई टी घोटाळ्यात अटक झाल्यानंतर शैलजा दराडे यांची त्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शैलजा दराडे ही 2019 ला शिक्षण संचालक असताना केलेल्या व्यवहारामुळे वादात सापडल्यात. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.