ED नोटीसनंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले Anil Parab ...
मुंबई : ईडीच्या नोटीसनंतर शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ईडीची नोटीस आज संध्याकाळी मिळाली, त्यात कुठल्याही प्रकरणाचा स्पष्ट उल्लेख नाही. केवळ 31 ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहावं असं नोटीसमध्ये म्हटलं आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
नोटीसमध्ये स्पष्ट कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे ही नोटीस कशा संदर्भात आहे हे आता सांगता येणे सध्यातरी कठीण आहे. नोटीसमध्ये सविस्तर काही लिहीलं नाही त्यामुळे कुठल्या कारणास्तव ही नोटीस दिली हे सांगता येणार नाही. केवळ चौकशीसाठी बोलावल्याचा त्यात उल्लेख आहे. यावर कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही त्याला उत्तर देऊ. ईडीची नोटीस येईल ही असा अंदाज होताच. आता कायदेशीर बाबींचा विचार करुन याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
