(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anandache Paan:महेंद्र भवरे यांच्या फुले आंबेडकरी वाङ्मयकोश विषयी आनंदाचे पान कार्यक्रमात खास गप्पा
Anandache Paan:महेंद्र भवरे यांच्या फुले आंबेडकरी वाङ्मयकोश विषयी आनंदाचे पान कार्यक्रमात खास गप्पा
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ पुरस्कृत आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या वतीने 14 वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन 23, 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी, संशोधक, साहित्य इतिहासकर डॉ. महेंद्र भवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संमेलनाध्यक्षपदी योग्य अशा व्यक्तीची निवड करण्याच्या दृष्टीने आयोजकांनी आंबेडकरी साहित्य विश्वातील मान्यवरांकडून नामनिर्देश आणि निवडी संबंधीच्या सूचना मागविल्या होत्या. यामध्ये प्रा.भवरे यांच्या नावाला सर्वाधिक पसंती दर्शविण्यात आली. आंबेडकरी साहित्य दालनाच्या आवाहनानुसार आयोजन समितीने महेंद्र भवरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.