(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amol Mitkari vs MNS: वाटेल ते राज ठाकरेंना बोलाल तर परिणाम भोगावे लागतील -संदीप देशपांडे
Amol Mitkari vs MNS: वाटेल ते राज ठाकरेंना बोलाल तर परिणाम भोगावे लागतील -संदीप देशपांडे
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर आज अकोल्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केलाय. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर दुपारीमिटकर अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडलीय. यामध्ये आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलीये. काल पुण्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली होतीय. त्या टिकेला उत्तर देताना आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हटले होतेय. यावरूनच संतप्त कार्यकर्त्यांनी आज अमोल मिटकरी यांच्यावर आणि गाडीवर हल्ला केलाय. आमदार अमोल मिटकरी दुपारी लोकांना भेटण्यासाठी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर आले होतेय. याचवेळी मनसेची एक आढावा बैठक विश्रामगृहात सुरू होतीय. मिटकरी विश्रामगृहावर असल्याचा समजतात मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेत त्यांच्याविरोधात प्रचंड नारेबाजी केलीय. यावेळी मिटकरींनी आपल्या खोलीतील अँटीचेंबरचा दरवाजा लावल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय यासंदर्भात अकोल्यातील सिविल लाईन पोलिसात हल्लेखोर मनसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहेय. हल्ला करणारे सर्व मनसैनिक सध्या फरार आहेत. हल्ल्यानंतर आपल्याला जीवे मारण्याचा मनसे कार्यकर्त्याला प्रयत्न असल्याचा आरोप आमदार म्हणून मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना केलाय.