Akola : निलंबित पोलीस शिपाई व्यापाऱ्याच्या नातेवाईकाची माफी मागताना 'कैद', काय आहे प्रकरण?
शेगावच्या सराफा व्यापाऱ्यावर अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत अमानुष छळ आणि मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यामुळं पोलिसांवर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहण्याची वेळ आली...आणि आता या प्रकरणातील पोलीस पीडित व्यापाऱ्याच्या नातेवाईकाच्या हाता पाया पडू लागले आहेत.. निलंबित पोलीस शिपाई शक्ती कांबळे पीडित व्यापाऱ्याच्या नातेवाईकाची माफी मागताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.. दरम्यान व्यापाऱ्यांनी ज्या पोलिसांवर आरोप केला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही...सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्यावर फक्त बदलीची कारवाई करण्यात आली आहे... त्यामुळं पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय..
महत्त्वाच्या बातम्या























