Akola Jawan Shahid : अकोल्यातील जवान प्रवीण जंजाळ शहीद; कुटुंबीयांनी फोडला हंबरडा, वडील भावूक
Akola Jawan Shahid : अकोल्यातील जवान प्रवीण जंजाळ शहीद; कुटुंबीयांनी फोडला हंबरडा, वडील भावूक जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झालेत. त्यानंतर सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले . तर अन्य चार जण लपून बसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली होती, त्यानंतर दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे दोन जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील प्रवीण जंजाळ या जवानाचा समावेश आहे. प्रवीण जंजाळ शहीद झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या मोरगाव भाकरे या गावावर शोककळा पसरली आहे. जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील फ्रिसल चिन्नीगाम भागात नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरु असताना सैन्य दलाची दहशतावाद्यांशी चकमक झाली. यामध्ये भारतीय सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.तर, दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं. अजून चार दहशतवादी लपून बसल्याची शंका सुरक्षा दलांना आहे. या घटनेत अकोल्यातील एक जवान शहीद झाला आहे. अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण प्रभाकर जंजाळ हे जवान शहीद झाले आहेत. प्रवीण जंजाळ शहीद झाल्याची माहिती गावापर्यंत पोहोचताच गावात शोककुल वातावरण पसरलं आहे. 2019 मध्ये प्रवीण जंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष झालं आहे. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.
![ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/8c8bb3f9f6f35c2a953e16f5c2962c481739802110139977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/d2b8b43687852013e4d7e27e646854851739797700076977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/36b0c9579a75ba25f7c8402907adaf1f1739796913808977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/bdc6360037c8ee0d676570679d6fb9461739792233292977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anjali Damania on AgriBegri : अंजली दमानियांनी ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर पोहचू दिली नसल्याचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/9dfb8959e9652324905d7af388a2658c1739791832407977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)