Ajit Pawar Speech Malegaon : गाफिल राहू नका, रात्र वैऱ्याची,अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना
Ajit Pawar Speech Malegaon : गाफिल राहू नका, रात्र वैऱ्याची,अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना
लोकसभा निवडणुक झाली त्यावेळी बँक उघडलेली होती. आज या बॅंकेमध्ये हे दुसऱ्यांदा घडत आहे. बॅंक कशी उघडी होती. बॅंकेचे नेतृत्व करणारे लोक आहेत, त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी ती बॅंक कशाला उघडेल. एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये आपल्याला दुसऱ्यांदा दिसते आहे. याचा अर्थ काय समजायचा तो समजा असंही पुढे शरद पवार म्हणाले आहेत. नेमकं काय प्रकरण? बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँक ही रात्री अकरा वाजता देखील उघडी होती असा आरोप करण्यात आला आहे. याच बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या यादी देखील सापडल्या असा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आलेला आहे. रात्रीच्या अकरा वाजता नेमकी ही बँक का उघडी ठेवण्यात आली होती याबाबत सहकार बचाव पॅनलचे कार्यकर्ते प्रश्न उपस्थित करत आहेत. या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला जात आहे. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास पोलीस दाखल झाले होते. सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांनी याबाबतचा जाब या ठिकाणी विचारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे आमच्या समोर गाडीत बसून गेले. मंत्री दत्तात्रय भरणे यांचे देखील सहकारी त्याठिकाणी होते, असा दावा रंजन तावरेंनी केला आहे. पुन्हा राजकीय वातावरण तापलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या























